एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पुन्हा जुळले जानव्हीचे सूत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १९ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पुन्हा एकदा जान्हवीचे सूत जुळल्याची चर्चा आहे. जान्हवी आणि शिखरने पुन्हा डेट करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी शिखर आणि जान्हवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. या पार्टीतील एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे.दिल्लीतील एका कार्यक्रमात जान्हवी शिखरसोबत आली. यावेळी व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे आणि त्याला मॅचिंग कलरचा ओव्हरकोट घातला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तर शिखर जॅकेटमध्ये झळकत आहे.

खरं तर 2016 मध्ये जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र आई श्रीदेवीमुळे जान्हवीने त्याच्यापासून फारकत घेत करिअरवर लक्ष केंद्रित केले होते. पण आता एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा दोघे एकत्र आले आहेत.काही दिवसांपूर्वी जान्हवी मालदिवमध्ये सुटी घालवण्यासाठी गेली होती. यावेळी ती एकटी नव्हती तर शिखरही तिच्यासोबत होता, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण शिखरने पोस्ट केलेला एक फोटो जान्हवीने शेअर केलेल्या फोटोशी मिळताजुळता आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम