उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यात बैठक
राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांच्यात भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील सर्टिक हाऊसमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. कामानिमित्त भाजप खासदार उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली आहे
उपुमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रासारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. उदयनराजे भोसले म्हणाले, अजितदादांसोबत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत उदयनराजे भोसले यांनी म्हटलं, वाईन विक्रीचा निर्णय का घेतला हे सरकारलाच विचारा. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो त्यामुळे काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी हेल्थ इज वेल्थ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्म समभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली होती.असं म्हटलं जात आहे की, ही एक सदिच्छा भेट होती.
नुकताच शरद पवारांचा वाढदिवस झाला आणि त्यावेळी शरद पवारांची भेट घेणं शक्य नाही झाले त्यामुळे आता उदयनराजेंनी दिल्लीत पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून ही एक सदिच्छा भेटच होती असं उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं होतं.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम