बहुजन जागृती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बौध्द समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ३१ जुलै २०२२ । जळगाव येथे बहुजन जागृती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जळगांव शहरातील बौद्ध समाजातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पबचत भवन जळगाव येथे शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन करण्यात आले व त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे होते. कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव शहराचे आमदार मा. सुरेश ( राजुमामा ) भोळे यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणुन जळगावचे माजी महापौर सदाशिवराव ढेकळे.

जामनेरचे नगरसेवक भगवान सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक चेतन सनकत, आर. पि. आय . चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, साहित्यिक वसंततात्या सपकाळे, भाजपा ओबीसी सेल महानगर अध्यक्ष जयेश भावसार , धीरज सोनवणे
( मुंबई ), सागर नन्नवरे, मिलिंद सोनवणे, डी एम अडकमोल, राजू मोरे, यशवंत घोडेस्वार, आनंदा तायडे, गौतम सपकाळे आदि उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हा सह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिपक सपकाळे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जे. डी. भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पारधे, भीमराव सोनवण, आनंदा सोनवणे , गौतम सोनवणे, दिपक बिऱ्हाडे, राजू सपकाळे ( पिंप्राळा ), राजू सपकाळे ( सिद्धार्थ नगर ), प्रविण परदेशी, सिद्धार्थ गव्हाणे, बेबाबाई सपकाळे, आशाबाई अन्नावर, ऊषाबाई सपकाळे, लिलाबाई खिल्लारे, कलाबाई पारधे, रुपाली भालेराव आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम