सरगम कौशल बनली मिसेस वर्ल्ड 2022
मुंबई चौफेर I १९ डिसेंबर २०२२ I देशांतील महिलांनी भाग घेतला होता, त्यापैकी सरगम कौशलने बाजी मारली आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेली सरगम व्यवसायाने शिक्षिका आहे. तिने 2018 मध्ये नौदलाच्या अधिकाऱ्याशी लग्न केले. सरगमने आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि पती यांना दिले आहे.
मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे. मुकुटाच्या क्षणाची एक झलक इथे शेअर करताना लिहिले आहे की, दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. हा मुकुट 21 वर्षांनंतर परत आला आहे. सरगमपूर्वी 2001 मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी हा किताब जिंकला होता.
पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. यापूर्वी, सरगमने १५ जून २०२२ रोजी मिस इंडिया वर्ल्ड २०२२ चा पुरस्कार जिंकला होता. त्यांना ही पदवी नवदीप कौर यांनी दिली होती.कोण आहे सरगम कौशल?
जम्मू-काश्मीरमधील 32 वर्षीय सरगम कौशलने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सरगमने विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. सरगमचे 2018 मध्ये लग्न झाले, तिचा नवरा भारतीय नौदलात आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम