‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने केली अवघ्या तीन दिवसांत 136.45 कोटींची कमाई

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १९ डिसेंबर २०२२ I जेम्स कॅमेरुन यांचा ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपटा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 2009 साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता 13 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट जगभरात धमाका करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे.

‘अवतार 2’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 42-43 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर तिसऱ्या दिवशी रविवारी या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल 136.45 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाच्या इंग्लिश वर्जनने 24 कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी या चित्रपटाने 14 कोटी, तेलुगूत 4 कोटी, तामिळमध्ये 3 कोटी आणि मल्याळममध्ये 45 कोटींची कमाई केली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम