टीव्ही ऍक्ट्रेस रिद्धी डोगरा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १४ डिसेंबर २०२२ I छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने बॉलीवूडमध्ये पाय ठेवला असून आगामी वर्ष हे तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील वर्षी तिचे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असून हे दोन्ही चित्रपट बिग बजेट स्वरुपाचे चित्रपट आहेत.

दिग्दर्शक अॅटली याचा चित्रपट जवान हा 2023 साली प्रदर्शित होणार असून यामध्ये शाहरूख खान हा मुख्य भूमिकेत आहे. टायगर 3 देखील 2023 मध्ये प्रदर्शित होत असून यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.शाहरूख खान याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा आपल्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा होता, कारण मी त्यांची पूर्वीपासून मोठी फॅन असल्याचे रिद्धीने म्हटले आहे. शाहरूख हा मूळचा दिल्लीचा आहे. रिद्धी ही देखील मूळची दिल्लीची असल्याने तिचे शाहरूखसोबत विशेष बंध जुळले होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम