आरव भाटियाचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ६ जानेवारी २०२३ । अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. खरंतर आरवला विमानतळावर सुरक्षा रक्षकानं थांबवले होते.

ही गोष्ट एअरपोर्टवरच्या पापाराजींनी कॅमेऱ्यात कैद केला.
सिक्युरिटीने आरवला फक्त थांबवलेच नाही तर त्याची संपूर्ण कागदपत्रे तपासणी होईपर्यंत बराच वेळ एंट्री गेटवर उभे केले.


एअरपोर्टवर अक्षय कुमारच्या मुलाला थांबवले
अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरव सध्या यूकेमध्ये शिकत आहे. या व्हिडिओमध्ये आरव कारमधून खाली उतरताना आणि जॅकेट हातात घेऊन विमानतळाच्या आत जाताना दिसत आहे. सहसा स्टार्स आणि स्टार किड्सना एंट्री गेटवर एवढी वाट पहावी लागत नाही आणि व्हीआयपी एंट्री लागेच मिळते, मात्र आरवच्या बाबतीत असे घडले नाही. सिक्युरिटीने आरवला गेटवर थांबवले आणि कागदपत्रे दाखवण्यास सांगितले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम