प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसमोर या ४ गोष्टी लक्षात ठेवाव्यात
डिजिटल मुंबई चौफेर। १७ फेब्रूवारी २०२२।
आचार्य चाणक्य यांचे शब्द ऐकायला कठोर वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांचा जीवनात अंगीकार केला तर मोठे संकटही सहज टाळता येते. आचार्य चाणक्य यांनी जे काही सांगितले ते सर्व त्यांच्या जीवनाचे सार आहे. आचार्य हे महान व्यक्तिमत्व होते. त्यांना अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे सखोल ज्ञान होते. आचार्य इतके अनुभवी होते की ते कोणत्याही परिस्थितीचा वेळेपूर्वी अंदाज घेत असत आणि त्यास सामोरे जाण्यासाठी धोरण तयार करत असत. ही आचार्यांची कुशल बुद्धी होती, ज्याच्या जोरावर त्यांनी संपूर्ण नंद वंशाचा नाश करून मौर्य वंशाची स्थापना केली. आचार्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात जीवनातील प्रत्येक पैलू समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे जाणून घ्या अशा काही गोष्टींबद्दल ज्या पालकांनी मुलांमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या मुलांवर वाईट परिणाम होतो.
भाषा
तुमची मुलं तुम्हाला पाहून शिकतात. तुमची मुले सभ्य आणि सुसंस्कृत व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांची भाषा सुधारणे. यासाठी तुम्हाला त्यांच्यासमोर चांगली भाषा वापरावी लागेल. जर तुम्ही मुलांसमोर चुकीची भाषा बोललात तर तुमची मुलंही तेच पाळतील.
खोटे बोलू नका
अनेकवेळा पालक मुलांसमोर खोटे बोलतात किंवा मुलांना त्यांच्या स्वार्थासाठी खोटे बोलायला लावतात, यामुळे तुमची मुले खोटे बोलायला शिकतात. पुढे जाऊन त्यांची ही सवय तुमच्यासाठीच अडचणी वाढवू शकते.
परस्पर आदर ठेवा
मुलांसमोर नेहमी एकमेकांशी आदरयुक्त भाषेत बोला. जर तुम्ही एकमेकांचा आदर करत नसाल तर तुमची मुलं तुमच्याकडून हे शिकतील. भविष्यात ते तुमचा अपमान करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.
दोष शोधू नका
घरात एकमेकांच्या उणीवा काढू नका. तसेच कोणाचाही अपमान करू नका. तुमची ही सवय तुमच्या मुलांना इतरांमधील दोष शोधायला शिकवेल. अशा परिस्थितीत मुलांची शिकण्याची क्षमता कमी होईल आणि ते इतरांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम