विवाहितेचा ५ लाखांसाठी छळ ; गुन्हा दाखल
मुंबई चौफेर | २४ नोव्हेंबर २०२२ | तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाखासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या भारतीय निलेश सोनवणे (वय-३०) या विवाहितेचा नाशिक येथील निलेश राजेंद्र सोनवणे यांच्याशी सन २०२० मध्ये रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर तिचे पती निलेश सोनवणे यांनी ऑफिससाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने कोणतीही पैसे न आणल्यामुळे मनात राग ठेवून पती निलेश राजेंद्र सोनवणे याने तिला शिवीगाळ करून मारहाण करत छळ केला. तसेच सासू, नंणंद व नंदोई, मावस सासरे यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी किनगाव ता. यावल येथे आल्या. विवाहितेने यावल पोलिसांत तक्रार दिली . तक्रारीवरून पती निलेश राजेंद्र सोनवणे, सासू सीमा राजेंद्र सोनवणे, नणंद प्रज्ञासागर निकम, नंदोई सागर शंकरराव निकम, मावस सासरे किशोर उत्तमराव हिरे सर्व रा. सिडको नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले करीत आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम