धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत धरणगाव शहरात निर्माल्य संकलन

धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत धरणगाव शहरात निर्माल्य संकलन

बातमी शेअर करा

धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत धरणगाव शहरात निर्माल्य संकलन

महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत धरणगाव येथे गणपती विसर्जना निमित्त श्री बैठकीतील श्रीसदस्य मार्फत निर्माल्य संकलन करण्यात आले.त्यात एकूण निर्माल्य 1 टन संकलन झाले निर्माल्य संकलनासाठी श्रीबैठक धरणगाव, श्रीबैठक पिंपरी खुर्द, श्रीबैठक पाळधी, श्रीबैठक बिलखेडा व श्रीबैठक सोनवद येथील एकूण 162 श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला दरवर्षा प्रमाणे निर्माल्य संकलन सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत अखंडित सेवा श्रीसदस्यांनी केली त्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून जसे जुनी नगरपालिका गांधी उद्यान, तेली तलाव सिद्धी हनुमान मंदिर, चोपडा अमळनेर फाटा जवळ स्टॉल लावण्यात आले डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, प्रौढ साक्षरता वर्ग, बाल संस्कार केंद्र, वृक्ष लागवड व संवर्धन, स्वच्छता अभियान विहिरीतील गाळ काढणे बोरवेल व विहीर पुनर्भरण असे विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात याची दखल घेऊन शासनाने पद्मश्री आदरणीय डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केले आहे. याप्रसंगी सकाळी 10 वाजता उद्घाटनाप्रसंगी धरणगाव शहराचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताड साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष पवार साहेब, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार साहेब, शिवसेना सह संपर्कप्रमुख श्री गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री निलेश चौधरी, गटनेता श्री कैलास माळी सर, नगरसेवक राजेंद्र महाजन, नगरसेवक विजय महाजन, सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, श्री भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ जाधव, वाल्मीक पाटील, भैय्या महाजन असे अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम