‘इतक्या’ कोटींमध्ये विकले गेले ‘पठाण’चे ओटीटी अधिकार
मुंबई चौफेर I २५ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, अशातच आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे की, पठाण चित्रपटाचे ओटीटी अधिकार करोडोंमध्ये विकले गेले आहेत.
25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार पठाण चित्रपट मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट अमॅझोन प्राईम व्हिडीओने शनिवारी 100 कोटींमध्ये खरेदी केला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम