या दिवशी होणार पठाणच्या ‘बेशरम रंग’ गाणे रिलीज

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ९ डिसेंबर २०२२ I शाहरुख खानच्या ‘ पठाण या चित्रपटाच्या प्रमोशनची प्राेसेस सुरू झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे जेणेकरून चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षकांमध्ये उत्साह भरला जाईल.

https://www.instagram.com/p/Cl74aZavMoS/?hl=en

पोस्टर्स, टीझरनंतर आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज होणार आहे. शाहरुख खानने त्याच्या सोशल अकाऊंटवर दीपिका पदुकोण हिचे पोस्टर शेअर केले आहे. त्यानुसार ‘पठाण’चे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ 12 डिसेंबरला रिलीज होत आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील तिचा लूकही खूप वेगळा असेल. रिलीज झालेल्या नवीन पोस्टरमध्ये दीपिका गोल्ड कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचा किलर लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे आणि असे मानले जातं आहे की, हे गाणे रिलीज होताच चार्टबस्टर्समध्ये स्थान मिळवेल.

पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिले, “बेशरम रंग या गाण्याची वेळ आली आहे… गाणे 12 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता रिलीज होत आहे.” त्याने असेही लिहिले की, “जवळच्या सिनेमागृहांमध्ये ‘पठाण’द्वारे YRF ची 50 वर्षे एंजॉय करा. ‘पठाण’ 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम