सुवर्ण महोत्सवी शाळेत माजी सैनिक जुलाल पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

सुवर्ण महोत्सवी शाळेत माजी सैनिक जुलाल पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

बातमी शेअर करा

सुवर्ण महोत्सवी शाळेत माजी सैनिक जुलाल पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

धरणगांव -सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे 13 ऑगस्ट रोजी शाळेची विद्यार्थिनी कु.ललिता रोहिदास झेंडे च्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व आज 14 ऑगस्ट रोजी शहरातील माजी सैनिक जुलाल नाना पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी. माळी यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी माजी सैनिक जुलाल पाटील यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत केले. जुलाल पाटील यांनी कारगिल युद्धाच्या वेळेस शौर्य दाखवून देशसेवा बजावली होती. जुलाल पाटील यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आपला देश आपल्यासाठी अभिमान आहे असे पाटील यांनी प्रतिपादन केले.

शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना फाळणी स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम