धरणगांव व्यापारी संकुलातील अस्वच्छता आणि मुताऱ्यांच्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांना होतोय त्रास
धरणगांव व्यापारी संकुलातील अस्वच्छता आणि मुताऱ्यांच्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांना होतोय त्रास
धरणगांव व्यापारी संकुलातील अस्वच्छता आणि मुताऱ्यांच्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांना होतोय त्रास
धरणगाव – शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.शहरातील मुख्य बाजार पेठेतील जवळपास एक कोटी रुपये खर्चून नुकत्याच बांधण्यात आलेल्या शौछालयात वेळेवर स्वच्छता होत नसल्याने अतिशय दुर्गंधी व अस्वच्छता बघायला मिळते.याबाबत परिसरातील नागरिक,व्यापारी व मजूर वर्ग यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज शुक्रवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूला असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलात असलेल्या मुताऱ्यांची दयनीय अवस्था बघायला मिळत आहे.मुतारी स्वच्छ होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.तसेच आजूबाजूला मोठा प्रमाणात अस्वच्छता बघायला मिळते.तर याठिकाणी उसाच्या रसवंतीचा कचरा देखील पेटविलेला दिसून आला.वेळेवर स्वच्छता होत नसल्याने नगरपालिकेच्या या गलथान कारभारावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला हात जोडून समस्या सोडविण्याची विनंती केली आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम