राहुल गांधींसोबत ट्रॉल झाल्याने उर्फीचा झाला संताप
मुंबई चौफेर I २९ डिसेंबर २०२२ I भारतातील इतर राज्यांसह दिल्ली येथे देखील हंडीचा तडाखा वाढत आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या दिल्ली येथे पोहोचली आहे. या यात्रे दरम्यान कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी कोणतेही उबदार स्वेटर न घालता केवळ एका टी शर्टवर दिसत आहेत.
अशातच राहुल गांधी यांनी ते स्वतः किती सक्षम आहेत हे दर्शवण्यासाठी स्वेटर न घातल्याचे बोलले जात आहे. अशातच राहुल गांधींना कपड्यांवरून ट्रोल करता करता काहींनी यावादात सोशल मीडिया स्टार आणि बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असलेली उर्फी जावेद गिला देखील ट्रोल केले. त्यावरून उर्फी फारच भडकली.
कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी फक्त टी शर्टवर आहेत तेव्हा ‘राहुल गांधींना थंडी वाजत नाही का?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतर भाजप नेते दिनेश देसाई यांनी ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींवर उपहासात्मक ट्वीट करण्यात आलं आहे. “जर थंडीमध्ये फक्त एक टीशर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी”, असं देसाई यांनी म्हटल आहे. त्यांच्या या ट्विटनंतर उर्फीने ट्विट करत देसाई यांच्यावर पलटवार केला आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम