छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणाला सुरुवात 

छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणाला सुरुवात 

बातमी शेअर करा

छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणाला सुरुवात

 

वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळालेल्या धरणगाव व परिसरातील दिवंगतांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण

 

धरणगांव : धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांनी दि.१४ सप्टे,२०२२ रोजी धरणगाव चे तहसिलदार श्री.देवरे, व पोलिस स्थानकचे पीएसआय श्री. पवार यांच्याकडे निवेदन सादर करून केले होते. धरणगाव ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा. यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतरही संबंधित कार्यालयाकडून आज दि. २० मंगळवार पावेतो लेखी स्वरुपात खुलासा न आल्यामुळे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून व धरणगाव शहरातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली.
धरणगाव तालुक्याचे ठिकाण असून देखील सुविधांचा अभाव आहे, आपातकालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय उपचार लागतो येथील रुग्णालयात आवश्यक सुविधा २४ तास उपलब्ध असायला पाहिजे. तज्ञ डॉक्टरांची टीम व सुसज्ज रुग्णवाहिका, तसेच ऑक्सिजनची सुविधा व इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या सर्व मागण्यासंदर्भात श्री.लक्ष्मणराव पाटील यांनी उपोषणास सुरूवात केली आहे.
सदर उपोषण हे संविधानिक मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून सुरू राहणार आहे. असे प्रतिपादन उपोषणकर्ते श्री.पाटील यांनी सांगितले.याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजेंद्र वाघ, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, जागृत जनमंचचे शिवराम पाटील, पाटील समाजाध्यक्ष भीमराज पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे बापू मोरे, पत्रकार विजयकुमार शुक्ल, जितेंद्र महाजन, सूरज वाघरे, मयूर भामरे, निलेश पवार, हर्षल चौहाण, एच.डी. माळी, पी.डी.पाटील, महेंद्र तायडे, विक्रम पाटील, अमोल सोनार, आनंद पाटील, भूषण भागवत, निलेश माळी, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, प्रफुल्ल पाटील, राकेश पाटील, राष्ट्रवादीचे अरविंद देवरे, मनोज पाटील, दिलीप पवार, संजय चौधरी, संजय पाटील, नारायण चौधरी आदी सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम