या अभिनेत्रीने केले बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल मोठे खुलासे

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १७ डिसेंबर २०२२ I टीव्ही सीरियल ‘बेंथा’ फेम अभिनेत्री अंजली कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

मुंबईसारख्या शहरात राहणं किती कठीण झाले होते हे तिनं सांगितले. ती आणि तिचा जोडीदार एकत्र मुंबईला आले. तिनं येताना सुटकेससोबत अभिनेत्री बनायचे स्वप्न घेऊन आली होती. पण यशाच्या मार्गावर जाताच तिच्या साथादाराने तिची साथ सोडली. पण तिने हार न घेता पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहिली. अंजलीने पुढे सांगितले की, ती 3 वर्षे डिप्रेशनमध्ये (Depression) होती. अंजलीचा आयुष्यावरील विश्वास उडाला होता. पण घरी गेल्यावर अभिनेत्रीने तिचा आत्मविश्वास आणि भावनांवर काम केले. अंजलीने सांगितले की, तिला या खडतर प्रवासाने कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही हे शिकवलं. अंजली पुढे म्हणाली की, ती शिकली आहे की एखाद्याने नेहमी स्वतःला प्रथम स्थान दिले पाहिजे. आपल्या सुखाची काळजी आपणच घेतली पाहिजे. तिनं कुटुंबासोबत वेळ घालवला. कठीण प्रसंगी अंजलीचे कुटुंबीय तिच्या पाठीशी उभे राहिले. अंजलीने सांगितले की, ती रोज काहीतरी नवीन आणि चांगले करण्याचा प्रयत्न करते. कामाबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच ही अभिनेत्री ‘फार्म हाऊस’ वेब सीरिजमध्ये दिसली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम