जागतिक पर्यावरण दिनी जी.एस.नगर मध्ये वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनी जी.एस.नगर मध्ये वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनी जी.एस.नगर मध्ये वृक्षारोपण
वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज – पो.नि.राहुल खताळ
धरणगाव प्रतिनिधी – निलेश पवार
धरणगाव – आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धरणगाव शहरातील जी.एस.नगर या कॉलनीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलनी वासी सुधाकर मोरे यांनी केले. या वृक्ष लागवड कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, तहसिलदार नितीन कुमार देवरे,कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, सौ.सुरेखा सुनील चौधरी,जलदुत फाऊंडेशनचे संचालक डॉ.पंकज अमृतकर, डॉ.सुचित जैन,मनोज महाजन, योगेश भाटिया, नितेश महाजन, फॉरेस्ट चे अधिकारी साळुंखे साहेब, क्षिरसागर साहेब, सागर झुंझारराव, शांताराम पाटील, अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य बी.आर. महाजन, आर.डी.महाजन, जितेंद्र महाजन, अविनाश बाविस्कर, पी.डी.पाटील, भारतीय सैनिक वासुदेव न्हावी, गुरुकुल इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्य वैशाली पवार मॅम, जि.प.चे मुख्याध्यापक कैलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते जी.एस.नगर येथे १५ वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये नीम, पिंपळ, लिंबू अशा वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचे संगोपन करण्यासाठी कॉलनीतील सुधाकर मोरे यांनी स्वतः ठिबक नळीची व्यवस्था करून १५ वृक्ष जगविण्याची सपत्नीक शपथ घेतली.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे गुणवंत आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांचा संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा देऊन, आदर्श शिक्षक कैलास पवार सर यांचा डॉ.आंबेडकर यांचे राजकीय विचार हा अनमोल ग्रंथ देऊन, कौशिक सुधाकर मोरे या विद्यार्थ्याचा वृक्षगाथा हा अनमोल ग्रंथ देऊन पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सुनील चौधरी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांनी कॉलनी वासियांचे या उपक्रमाचे कौतुक केले. ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” पर्यावरण ही काळाची गरज आहे तिचे संगोपन करून एक आदर्श निर्माण जी.एस. नगरवासीयांनी केला या चांगल्या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रथम वृक्ष लागवड सुरेखा चौधरी, वैशाली पवार, कल्पना मोरे, वेणू पाटील, अंकिता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली.
कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता असल्याने बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला म्हणून धरणगाव शहरात जवळ जवळ मागील काही वर्षात ५,००० वृक्षांची लागवड करून वृक्षांचे संगोपन करत आहोत व यापुढेही करत राहणार असा संकल्प केला. वृक्षप्रेमी सुनील भाऊ चौधरी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला नीमचे वृक्ष देऊन कॉलनी वासियांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.चि.कौशिक मोरे चा पंधरावा वाढदिवसाच्या निमित्ताने श्रमपरिहाराने खड्डे खोदून स्वखर्चाने ठिबक लावून दिली आणि ओपनस्पेसची सफाई केली. कॉलनी वासियांनी ट्रिगार्ड व सिमेंट चे बाकडे देण्याचे आश्वासन दिले.आणि मंदिर व लाँन्स विकसित करण्यासाठी संकल्प केला. जलदुत फाउंडेशनचे नितेश महाजन यांनी या वृक्षांना ट्री गार्ड देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बी.आर. महाजन सर यांनी तर आभार पी.डी.पाटील यांनी मानले.
या वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाकर मोरे,विनायक न्हावी, प्रशांत सूर्यवंशी,बबलू पवार,नरेंद्र पाटील,सागर चौधरी,राजेंद्र चौधरी, राकेश महाजन, उदय मोरे, सागर पाटील,शरद पाटील,आत्माराम चौधरी, जे.एस.पवार, बी.एम.सैंदाणे,एस.एन.कोळी, बाळू अत्तरदे महेंद्र सैनी,व सर्व जी.एस.नगर व कृष्ण गीता नगर वासीयांनी सहकार्य केले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम