जगभरातील 50 सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश
मुंबई चौफेर I २१ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत. जवळपास 35 वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये शाहरुखने चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. याचाच प्रत्यय आता एका मॅगझिनमधून यला मिळत आहे.
जगभरात प्रसिद्ध असणारे एम्पायर या मॅगझीनमध्ये जगभरातील आत्तापर्यंतच्या 50 सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची यादी जाहिर करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतातून केवळ शाहरुख खानला स्थान मिळालेलं आहे. या यादीत हॉलिवूडमधील टॉम हॅंक्स, मर्लिन मुनरो आणि केट विंसलेट यांच्या सहित अनेक कलाकारांचे नाव आहे.
https://twitter.com/empiremagazine/status/1605186505126944768/photo/1
शाहरुखच्या चित्रपटांचा उल्लेख
या मॅगझिनमध्ये शाहरुखच्या ‘देवदास’, ‘माय नेम इज खान’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘स्वदेस’ या चित्रपटांचे नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. याच्यासोबतच या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. यात देवदास मुखर्जी, रिजवान खान, राहुल खन्ना आणि मोहन भार्गव ही नावं आहेत.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम